फटाके, जयघोष,पेढे आणि ढोल ताशाच्या गजरात– दिवा शहरात उद्धव साहेबांच्या वाढदिवसाचा अविस्मरणीय सोहळा”
“फटाके, जयघोष,पेढे आणि ढोल ताशाच्या गजरात– दिवा शहरात उद्धव साहेबांच्या वाढदिवसाचा अविस्मरणीय सोहळा”
दिवा:- शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिवा शहरात उत्साह, आनंद आणि शिवसैनिकांच्या जोशात अविस्मरणीय सोहळा पार पडला.
दिवा शहरातर्फे विकास म्हात्रे गेट येथे दिवा शहर संघटिका ज्योती पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाढदिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या रोषणाईत आणि जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढ्यांचे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.
या सोहळ्यात शिवसैनिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवून साहेबांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. संपूर्ण दिवा शहरात उत्साह, ऐक्य आणि शिवसेनेचा जयघोष घुमला. या उपक्रमामुळे साहेबांच्या नेतृत्वावर असलेले प्रेम आणि शिवसैनिकांची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली.यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे दिवा शहर प्रमुख सचिन पाटील दिवा शहर संघटिका ज्योती पाटील उपशहर प्रमुख मारुती पडळकर उप शहर संघटक शनिदास पाटील विभाग प्रमुख रवी रसाळ योगेश निकम उपविभाग प्रमुख अशोक आंबोडकर संदीप राऊत मंगेश शेलार शाखाप्रमुख शशिकांत कदम विलास मुलम गजानन शेलार समीर परब उपशाखाप्रमुख सचिन केसरकर धनाजी पोवार सुयोग राणे उपशहर अधिकारी युवा सेना अमित कुडतरकर युवा सेना शाखा अधिकारी प्रवीण उतेकर नागेश पवार आदी कार्यकर्तेउपस्थित होते.