Breaking
राजकिय

रिपब्लिकन लोकनेते दिवंगत एकनाथ भगत साहेब यांचे जाण्याने RPI-A व बौद्ध समाजाची दिव्यात मोठी हाणी – सौरव आढांगळे

0 0 4 0 5 6

रिपब्लिकन लोकनेते दिवंगत एकनाथ भगत साहेब यांचे जाण्याने RPI-A व बौद्ध समाजाची दिव्यात मोठी हाणी – सौरव आढांगळे

रिपब्लिकन पक्षाचे ओबीसी आघाडी अध्यक्ष ठाणे शहर दिवंगत एकनाथ भगत यांचे निधन झाले व आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक धक्का बसला.दिव्यातील आगरी समाजाचे भूमिपुत्र असलेले एकनाथ भगत यांनी आपले संपूर्ण आयुष्य आंबेडकरी चळवळीला समर्पित केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांचे नेतृत्वाखाली दिव्यात रिपब्लिकन पक्ष वाढवला.आयुष्याचे शेवट पर्यंत रिपब्लिकन पक्षाची एकनिष्ठ राहिले.दिव्यातील सामाजिक सलोखा राखण्यासाठी एकनाथ भगत साहेब यांनी आजवर महत्वाची भूमिका बजावली. दिव्यातील गोरगरीबांचा आवाज म्हणजे एकनाथ भगत, दिव्यातील बहुजन समाजाचा नेता म्हणजे एकनाथ भगत अशी ओळख.
दिवंगत रिपब्लिकन लोकनेते एकनाथ भगत यांनी कित्येक वेळा बौद्ध समाजाकडे एक इच्छा व्यक्त केली. मी जेव्हा या जगाचा निरोप घेईल तेव्हा माझ्या पार्थिवावर निळा झेंडाच असेल. निळ्या झेंड्याशी आयुष्याचा शेवटपर्यंत एकनिष्ठ राहील. रिपब्लिकन पक्षाचे हितासाठी मी आयुष्याचे शेवट पर्यंत जागेल. खऱ्या अर्थाने शब्दाला जागणारे रिपब्लिकन लोकनेते यांनी आज या जगाचा निरोप घेतला असा नेता होने नाही
दिव्यात जी आंबेडकरी चळवळीची हाणी झाली ती कधीही न भरून निघणारी. दिवंगत रिपब्लिकन लोकनेते, दिवा गावचे आगरी समाजाचे भूमिपुत्र, आंबेडकरी चळवळीचा शिलेदार यांचे दिव्यात अर्धाकृती पुतळा बसुन स्मारक व्हावे व एकनाथ भगत साहेब यांच्या स्मृती जपाव्या.पुन्हा एकदा रिपब्लिकन लोकनेते दिवंगत एकनाथ भगत साहेब यांना अखेरचा जय भीम

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

आर एल न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 5 6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे