Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी महासभेत केला सादर; महापौर शर्मिला पिंपळोलकर सभेच्या अध्यक्षस्थानी

0 0 4 0 5 6

कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी महासभेत केला सादर; महापौर शर्मिला पिंपळोलकर सभेच्या अध्यक्षस्थानी

सन 2026-27 च्या मूळ अर्थसंकल्पातील प्रमुख उद्दिष्टे :

कोणतीही करवाढ नसणारा अर्थसंकल्प
महसुली उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न
आर्थिक शिस्त व संतुलन राखणे
आरोग्य व शिक्षण यामध्ये गुंतवणूक
हरित ठाण्यासाठी शाश्वत उपाययोजना
पर्यावरण संरक्षण
गतिमान वाहतुकीसाठी पायाभूत सुविधांची कामे
प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता व कार्यक्षमता यावर भर
महापालिका शाळांचा कायापालट व गुणवत्तापूर्ण शिक्षणांवर भर
महिला, ज्येष्ठ नागरिक व कल्याणकारी योजनांना गती

ठाणे : कोणतीही करवाढ नसलेला तरीही महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर, कामांचा दर्जा उत्तम रहावा याकडे विशेष लक्ष देणारा सन 2026-2027 चा 6221 कोटी 12 लक्ष रूपयांचा मूळ अर्थसंकल्प आज, सोमवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना विशेष सर्वसाधारण सभेत सादर केला. नागरिकांना चांगेल जीवनमान देता यावे यासाठी महापालिका कटीबद्ध असून अर्थसंकल्पाची त्यादृष्टीने मांडणी करण्यात आल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अर्थसंकल्पीय सभेत केले. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर शर्मिला पिंपळोलकर होत्या.

तसेच परिवहन सेवेचा 791 कोटी 86 लक्ष रुपयांचा मूळ अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याकडे सादर केला. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ ऊ शानू पठाण, सर्वपक्षीय गटनेते पवन कदम, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, मुकेश मोकाशी, अभ‍िजीत पवार, सरफराज खान उर्फ सैफ पठाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सन 2025-26 चा 5645 कोटी रकमेचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता. यामध्ये पाणी पुरवठा आकार, व शहर विकास विभाग, अग्निशमन या विभागांच्या उत्पन्नात काही प्रमाणात घट येत आहे. त्यामुळे महसुली उत्पन्न रु. 3523 कोटी 79 लक्ष ऐवजी रु.3461 कोटी सुधारित करण्यात येत आहे. महापालिकेस प्राप्त होणा-या अनुदानाचा विचार करता, मूळ अर्थसंकल्पात अपेक्षित केलेल्या रु. 612 कोटी 59 लक्ष अनुदाना ऐवजी प्रत्यक्षात डिसेंबर 2025 अखेर रु. 1269 कोटी 61 लक्ष अनुदान प्राप्त झाले असल्याने सुधारित अर्थसंकल्पामध्ये अनुदान व सहाय्यक अनुदानापोटी रु.1493 कोटी 15 लक्ष अपेक्षित केले आहे व अमृत 2.00 योजनेसाठी रु. 60 कोटी 89 लक्ष कर्ज अपेक्षित धरण्यात आले होते परंतु अमृत 2.00 अंतर्गत कर्ज न घेता केंद्र शासनामार्फत बिनव्याजी अर्थसहाय्यापोटी 98 कोटी 68 लक्ष प्राप्त झाले आहे. खर्च बाजूस सन 2025-26 मध्ये महसुली खर्च रु. 3722 कोटी 93 लक्ष प्रस्तावित केला होता, तो सुधारित अंदाजपत्रकात रु.3440 कोटी 80 लक्ष अपेक्षित असून भांडवली खर्च रु.1921 कोटी 41 लक्ष ऐवजी भांडवली अनुदानात वाढ झाल्याने भांडवली खर्च रु.1996 कोटी 39 लक्ष सुधारित करण्यात आला आहे. तसेच सन 2026-27 चा मूळ अर्थसंकल्पामध्ये महसूली उत्पन्न 4078 कोटी अपेक्ष‍ित असून अनुदान व कर्जासह 6221 कोटी 12 लक्ष रकमेची जमा बाजू 3818 कोटी 17 लक्ष महसूली खर्च व 2401 कोटी 55 लक्ष भांडवली खर्चाचा रु. 1 कोटी 40 लक्ष अखेरच्या शिलकेसह रु. 6221 कोटी 12 लक्ष रुपयांचा मूळ अर्थसंकल्प असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.

या पत्रकार परिषदेस, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयक्त मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिपक शिंदे, ठाणे परिवहन सेवेचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, व्यासपीठावर उपस्थित होते. त्याचवेळी परिवहन उपक्रमाचे सन 2026-27 चे मूळ अंदाजपत्रक 791 कोटी 86 लक्ष महापालिका आयुक्त सौरभ राव यांना ठाणे परिवहन सेवेचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी सादर केले.
#ThaneBudget2026 #NoTaxIncrease #ThaneMunicipalCorporation #SaurabhRao #SharmilaPimpalolkar #UrbanDevelopment #CitizenWelfare #ThaneUpdates

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

आर एल न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 5 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे