Breaking
ब्रेकिंग

हिंदी सक्तीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तीव्र निषेध – दिवा शहरात जीआरची होळी

हिंदी सक्तीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तीव्र निषेध – दिवा शहरात जीआरची होळी

0 0 4 0 5 6

हिंदी सक्तीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तीव्र निषेध – दिवा शहरात जीआरची होळी

दिवा:- दिवा शहरातील प्रभाग क्रमांक 28 मध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्य सरकारने लादलेल्या हिंदी सक्तीविरोधात तीव्र निषेध नोंदवत सरकारच्या हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करण्यात आली.
या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारचा विरोध करताना मराठी भाषेवरील अन्यायाविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. “मराठी माणसाचा, मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही”, अशा निर्धारपूर्ण घोषणा देत स्थानिक कार्यकर्त्यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वारंवार सांगितले आहे की, महाराष्ट्राच्या मातृभाषेवर कुठलीही सक्ती, भले ती भाषेच्या नावाखाली का असेना, सहन केली जाणार नाही. दिवा शहरातील कार्यकर्त्यांनीही आजचा आंदोलनाद्वारे हाच संदेश पुन्हा
राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
या आंदोलनात शिवसेनेचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे, विधानसभा संघटिका योगिता नाईक, महिला संघटिका ज्योती पाटील, उपशहर प्रमुख मारुती पडलकर, उप शहर संघटक शनिदास पाटील, विभाग प्रमुख संजय जाधव, योगेश निकम, हेमंत नाईक, रवी रसाळ, मा. नागेश पवार, उपविभाग प्रमुख संजय अर्धालकर, संजय निकम, संदीप राऊत, शाखाप्रमुख शैलेश कदम, दीपक उतेकर, मूर्ती मुंडे, दत्ता भोसले, उपशाखाप्रमुख राजेंद्र शिरसेकर, महेश मुलम, ज्ञानेश्वर कदम, शंकर राणे, आकाश विचारे, संजय राहंडाले, विलास मुलम, अमित कुर्ताळकर स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

आर एल न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 5 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे