भाजप दिवा मंडळातून ठाणे जिल्हा शहर चिटणीस श्री. विजय भोईर साहेब यांनी आयोजित केलेला भाजपा कार्यकर्ता संवाद मेळावा अत्यंत उत्साहात संपन्न झाला तसेच भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री.संदीपजी लेले साहेबांच्या उपस्थितीत अनेकांचा पक्ष प्रवेश पार पडला*
भाजप दिवा मंडळातून ठाणे जिल्हा शहर चिटणीस श्री. विजय भोईर साहेब यांनी आयोजित केलेला भाजपा कार्यकर्ता संवाद मेळावा अत्यंत उत्साहात संपन्न झाला तसेच भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री.संदीपजी लेले साहेबांच्या उपस्थितीत अनेकांचा पक्ष प्रवेश पार पडला*
*भाजप दिवा मंडळातून ठाणे जिल्हा शहर चिटणीस श्री. विजय भोईर साहेब यांनी आयोजित केलेला भाजपा कार्यकर्ता संवाद मेळावा अत्यंत उत्साहात संपन्न झाला तसेच भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री.संदीपजी लेले साहेबांच्या उपस्थितीत अनेकांचा पक्ष प्रवेश पार पडला
आज २२ जून रोजी दिवा मंडल माध्यमातून श्री.विजय भोईर साहेबांनी नवनिर्वाचित ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री.संदीप लेले साहेब, कल्याण जिल्हा अध्यक्ष श्री.नंदू परब साहेब यांचा सत्कार सोहळ्यानिमित्त कार्यकर्ता संवाद वैभव बँक्वेट हॉल,वारेकर हायस्कूल, दिवा पूर्व येथे आयोजित केला होता. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी या संवाद मेळाव्यात उपस्थित राहून श्री. लेले साहेब, परब साहेब, वाघुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. तसेच यावेळी बऱ्याच नागरिकांनी श्री.संदीप लेले साहेब, श्री.नंदू परब साहेब, श्री. संजय वाघुळे साहेब यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश देखील केला. या मेळाव्याच्या माध्यमातून श्री.विजय भोईर यांनी श्री लेले साहेबांकडे मागणी केली की , आम्हाला यावेळी दिव्यात आमचे हक्काचे नगरसेवक हवे आहेत. त्यासाठी आपण ठामपणे आमच्या पाठीशी उभे रहावे. तसेच सपना भगत महिला
मोर्चा अध्यक्ष यांनीदेखील महिला कार्यकर्त्यांना खूप चांगल्या प्रकारे प्रेरित केले.
त्यानंतर श्री. संजय वाघुळे साहेब यांनी कार्यकर्त्यांना पक्ष कसा वाढवावा, कार्यपद्धती समजावली.
तसेच कल्याण जिल्हा अध्यक्ष श्री. नंदू दादा परब यांनी देखील त्यांच्या मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण केला. आणि संपूर्ण समारंभाचे प्रमुख मार्गदर्शक श्री.लेले साहेब यांनी अत्यंत उत्स्फूर्त असे भाषण केले. आणि दिवा शहराशी असलेल्या त्यांच्या जुन्या आठवणी यावेळी जागवल्या.आणि सर्व भाजप कार्यकर्त्यांना यावेळी शब्द दिला की, अटलजींचे जसे शब्द होते की अंधकार जाऊन कमळ फुलेल, तसेच या दिव्यातही आपण कमळ यावेळी फुलवणारच आणि दिव्याचा कायापालट करणार हा शब्द दिला. त्यांच्या वक्तृत्वाने संपूर्ण हॉल अत्यंत भारावून गेला होता.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. करुणा बांगरगगे आणि श्री. सरचिटणीस समीर चव्हाण यांनी केले होते.
यावेळी मंडळ अध्यक्ष श्री.सचिन भोईर, गणेश भगत ,रोशन भगत,मधुकर पाटील, अजय सिंग, पंकज सिंग, अशोक गुप्ता, अशोक पाटील, दिलीप भोईर, अंकुश मढवी,सीमा भगत, संगीता भोईर,इत्यादी मान्यवर आणि शेकडो. कार्यकर्ते उपस्थित होते.