Breaking
आरोग्य व शिक्षण

“कायदा क्षेत्रात मोठी झेप! कळव्यात उभारली जाणार अत्याधुनिक अॅडव्होकेट अकॅडमी”

0 0 4 0 5 6

“कायदा क्षेत्रात मोठी झेप! कळव्यात उभारली जाणार अत्याधुनिक अॅडव्होकेट अकॅडमी”

ठाणे:- महाराष्ट्र व गोवा वकील परिषद, मुंबई यांना ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे अॅडव्होकेट अकॅडमी स्थापनेसाठी जमीन देण्यास महसूल विभागाने मान्यता दिली आहे.

या अकॅडमीच्या स्थापनेमुळे वकिलांना अत्याधुनिक प्रशिक्षण, बार परीक्षेसाठी तयारी, प्रॅक्टिकल सेशन्स, मूट कोर्ट, तसेच डिजिटल लॉ व सायबर लॉ सारख्या नवीन क्षेत्रांमध्ये कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे.

या संदर्भात अॅडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी सांगितले की, “ही अकॅडमी कायदा विद्यार्थ्यांसाठी व वकिलांसाठी सुवर्णसंधी ठरणार असून न्यायव्यवस्थेच्या बळकटीसाठी मोठा टप्पा आहे.”

कळवा परिसरात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, तसेचh स्थानिक व्यवसायालाही चालना मिळेल. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात कायदा शिक्षण व न्यायव्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

आर एल न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 5 6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे