दिव्यात बेडेकर नगर येथे ट्रकखाली येऊन ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
दिव्यात बेडेकर नगर येथे ट्रकखाली येऊन ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
दिव्यात बेडेकर नगर येथे ट्रकखाली येऊन ज्येष्ठ नागरिकाचा मृत्य
दिवा, दि. 5 जुलै – दिवा आगासन रोडवरील बेडेकर नगर येथे आज सकाळी 11 वाजता एक दुर्दैवी अपघात घडला. रस्ता ओलांडत असताना ट्रकखाली आल्याने दिपक हेमले (वय अंदाजे 60) या ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला.
दिपक हेमले हे एका डोळ्याने अंध होते. त्यामुळे रस्ता ओलांडताना दृष्टीअभावी त्यांना ट्रकची चाहूल न लागल्याने हा अपघात घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघाताची माहिती मिळताच दिवा पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह त्वरित रुग्णवाहिकेद्वारे शिवाजी महाराज रुग्णालयात पंचनामा करण्यासाठी पाठविण्यात आला.
दिपक हेमले यांच्या पश्चात त्यांची पत्नी आशा हेमले, दोन मुले – ओंकार आणि प्रणव हेमले, सून माधुरी हेमले व दोन नातवंडे असा परिवार आहे. अपघातानंतर ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास दिवा पोलीस करत आहेत. ह्या ट्रकची नागरिकांनी तपासणी केली असता. तो ट्रक वीटांचा असून त्या ट्रक मधील वीटां कुठेतरी इमारतीच्या बांधकांवर देऊन तो आगासन मार्गे दिव्याच्या बाहेर जात होता.



