दिवा शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि वाचनालय उभारण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब याना ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन
स्मारक आणि वाचनालय सुरु होइपरीयंत पाठपुरावा करणार ऑल इंडिया पँथर सेने दिवा शहर अध्यक्ष प्रफुल्ल तांबे

दिवा शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि वाचनालय उभारण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब याना ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन
या पत्राच्या माध्यमातून आपणास निदर्शनात आणून देत आहोत की ,ठाणे जिल्ह्यातील दिवा शहर हे सर्व सामान्य जनतेने व्यापलेले एक मोठे शहर असून या पूर्ण शहरात ज्या महापुरुषांनी या देशाला राज्याला ताठ मानेने जगायला शिकवले त्या महापुरुषांचा एक ही पुतळा या शहरात नाही हे आमचे फार मोठे दुर्दैव आहे .या शहरात अनेक वर्षापासून डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी वारवार मागणी करत असून प्रशासन दुर्लक्ष करत आहे .
म्हणूनच आम्ही आपणास कळकळीची विनंती करत आहोत की या दिवा शहरात अनेक ठिकाणी शासकीय भूखंड आहेत .या ठिकाणी अनेक बिल्डर यांनी जागा हडप करून बिल्डिंग चाळी उभ्या केल्या आहेत . परंतु याच शासकीय भूखंड असलेल्या जागेत या महापुरुषांचे पुतळे असतील तर काय वावग ठरणार आहे .म्हणूनच आम्ही मागणी करत आहोत की या शासकीय भूखंड असलेल्या जागेवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे करण्यात यावी .त्याच प्रमाणे पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही ,त्यामुळे प्रत्येकाला वाचनाची गरज आहे म्हणूनच याच ठिकाणी एक वाचनालय उभे करावे हीच नम्र विनंती.
आमच्या विनंतीचा आपण विचार कराल याच अपेक्षा .



