Breaking
महाराष्ट्र

र्तव्यावरील लोकसेवक पोलीस हवालदारावर हल्ला — महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने तीव्र निषेध..

0 0 4 0 5 6

र्तव्यावरील लोकसेवक पोलीस हवालदारावर हल्ला — महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने तीव्र निषेध…*

*दिनांक 21 जून 2025 रोजी रात्री 11.00* वाजण्याच्या सुमारास, शहाड रेल्वे पुलाच्या अलीकडे असलेल्या नाल्याच्या पुलाजवळ दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झालेली होती. सदर ठिकाणी वाहतूक नियंत्रण विभागाचे *लोकसेवक पोलीस हवालदार श्री.सचिन ओमासे* हे आपले कर्तव्य पार पाडत होते.

याच दरम्यान “केणे” नावाचा एक इसम वाहनचालक ( वाहन क्रमांक : MH 05 FL 9314 ) आपल्या दुचाकी वाहनास विरुद्ध दिशेने चालवून, रस्त्यावर अडथळा निर्माण करत होता. पोलीस हवालदार श्री.सचिन ओमासे यांनी संबंधित वाहनचालकास वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने वाहन बाजूला घेण्याचे विनम्र आवाहन केले. परंतु त्या इसमाने रागाच्या भरात पोलीस हवालदार श्री.सचिन ओमासे यांच्यावर अश्लील भाषेत शिवीगाळ करत, त्यांना लाथा, भुक्के व ठोसे मारून बेदम मारहाण केली. या घटनेत लोकसेवक पोलीस हवालदार गंभीर जखमी झाले असून, याचे दृढ व्हिडिओ व साक्षीदार स्वरूपात पुरावे उपलब्ध आहेत.

  1. सदर प्रकारामुळे संपूर्ण पोलीस विभागात व पोलीस परिवारात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर अशा प्रकारे हल्ला होणे अत्यंत निंदनीय असून, यामुळे शासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर आघात झाला आहे.
    *महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, महाराष्ट्र राज्य* यांच्याकडून प्रशासनास ठाम मागणी करण्यात येते की,
    ➡️ संबंधित आरोपी केणे याच्यावर शासकीय कामात अडथळा, सरकारी नोकरावर हल्ला आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्याबद्दल तात्काळ कठोर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी. जर प्रशासनाने यावर तात्काळ आणि कठोर पावले उचलली नाहीत, तर *महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना व राज्यातील संपूर्ण पोलीस परिवार रस्त्यावर उतरून जाहीर निषेध आंदोलन छेडतील,* असा स्पष्ट इशारा संघटनेच्या वतीने देण्यात येत आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

आर एल न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 5 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे