Breaking
गुन्हेगारीमहाराष्ट्रराजकिय

ठाणे महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच पोलिसांचा दणका करोडोची रक्कम आणि अमली पदार्थ केले जमा

0 0 4 0 5 6

ठाणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. निवडणुका शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडाव्यात यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाने कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे.
आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करताना पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत मोठ्या प्रमाणात रोकड, अमली पदार्थ आणि अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
निवडणूक ड्युटीसाठी नेमण्यात आलेल्या भरारी पथकांद्वारे आणि स्थिर तपासणी पथकांद्वारे विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. या तपासणीत आतापर्यंत २ कोटी १६ लाख ८९ हजार रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली आहे.

यासोबतच अमली पदार्थांविरोधात मोठी मोहीम राबवण्यात आली. गांजा, एमडी, कोकेन आणि हिरोईन यांसारख्या अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची एकूण किंमत सुमारे ७८ कोटी ३५ लाख रुपयांहून अधिक आहे. या प्रकरणांमध्ये ३,१४४ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच १०.९२ लाख रुपये किमतीची १३,२१५ लिटर अवैध दारूही जप्त करण्यात आली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने ऑपरेशन ऑल आऊट आणि कोम्बिंग ऑपरेशन अंतर्गत २७ बेकायदेशीर बंदुका, ३७ जिवंत काडतुसे आणि १४२ सुऱ्यांसारखी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय शहरातील ३,७६० परवानाधारक शस्त्रांपैकी ३,०६९ शस्त्रे पोलिसांकडे जमा करण्यात आली आहेत.

निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून ड्रोनद्वारे संवेदनशील भागांवर नजर ठेवली जाणार आहे. तसेच नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी रूट मार्च काढले जात आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवरही दररोज नजर ठेवून प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे.
ठाणे पोलिसांनी नागरिकांना आश्वासन दिले आहे की निवडणूक प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

आर एल न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 5 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे