#दिवा समर्थ नगर येथे चार चाकी गाडीला भीषण आग. नम्रता खराडे यांच्या सर्तकते मुळे मोठा अनर्थ टळला
अग्निशमन दळाची गाडी येण्यास जागाच नाही
दिवा प्रतिनिधी संदीप जाधव : समर्थ नगर मोरेश्वर प्लाझा च्या बाजूला चार चाकी व्हागणार गाडी नंबर MH04 KH8861 या गाडीला प्रचंड मोठी अग लागली.
दिव्यातील मनसे शाखा अध्यक्षा नम्रता खराडे यांना माहिती मिळताच त्यांनी अग्निशामन दल पोलीस स्टेशन आणि पत्रकार बांधवाना तात्काळ संपर्क करून सर्वाना माहिती दिली आणि स्वतः आग विझवण्यासाठी मदत सुद्धा केली.
आज दुपारी समर्थ नगर येथे शाखाध्यक्ष नम्रता खराडे, शिल्पा पार्टे मंथन पार्टे या सर्व पदाधिकाऱ्यांनी तिथे धाव घेतली. बाजूलाच ट्रान्सफॉर्मर असलेल्याने मोठा अनर्थ होण्याची शक्यता असताना आपल्या पदाधिकाऱ्यांनी समयसूचकता दाखवत टोरंट पॉवर, अग्निशामक दल आणि दिवा पोलिस यांना सूचना दिली.
अग्निशामकच्या गाड्या यायला जागा नसल्या कारणाने आग विझवण्यास उशीर होत असल्याने त्यांनी एका टँकर वाल्याला थांबवून त्यातून पाण्याचा मारा त्या गाडीवर सुरू केला. ज्यामुळे आग ट्रान्सफॉर्मर पर्यंत न पसरता मोठा अनर्थ टाळाला.



