Breaking
महाराष्ट्र

“महापालिका निवडणूक रणभूमीत ठाकरे गटाचा नवा जोश – कल्याण डोंबिवलीत परिवर्तनाची नांदी!”

"महापालिका निवडणूक रणभूमीत ठाकरे गटाचा नवा जोश - कल्याण डोंबिवलीत परिवर्तनाची नांदी!"

0 0 4 0 5 6

“महापालिका निवडणूक रणभूमीत ठाकरे गटाचा नवा जोश – कल्याण डोंबिवलीत परिवर्तनाची नांदी!”

डोंबिवली:- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार येणाऱ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण व नियोजनबद्ध बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला तसेच आगामी रणनितीवर विस्तृत चर्चा झाली.
बैठकीत कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख मा. गुरुनाथजी खोत साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्यासोबत उपनेते अल्ताफभाई शेख, भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख साईनाथ तारे, जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे, धनंजय बोडारे, अल्पेश भोईर, जिल्हा संघटक तात्यासाहेब माने, महिला जिल्हा संघटक वैशाली दरेकर, उपजिल्हा प्रमुख राहुल भगत, युवा जिल्हा अधिकारी प्रतीक पाटील,कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे, विधानसभा सहसंघटक नारायण पाटील, तालुका प्रमुख विजय भोईर, शहर प्रमुख शरद पाटील, बाळा परब, अभिजित सावंत, प्रकाश तेलगोटे यांच्यासह सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, शहर व विभाग प्रमुख यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.
या बैठकीत कल्याण-डोंबिवली व कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील संघटनात्मक बांधणी, बूथ स्तरावरील तयारी, कार्यकर्त्यांचे सशक्तीकरण तसेच जनता आणि मतदारांपर्यंत पक्षाचे विचार प्रभावीपणे पोहोचवण्याच्या योजनांवर चर्चा झाली.महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने जय्यत तयारीला सुरुवात केली असून संघटनेपासून प्रचारापर्यंत प्रत्येक टप्प्यावर प्रभावी नेतृत्व व कार्यकर्ता बांधणी हाच आमचा गाभा राहील, असे मत मा. गुरुनाथजी खोत यांनी व्यक्त केले.
शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आगामी निवडणुकीत विकास, पारदर्शकता आणि लोकाभिमुख प्रशासन याच मुद्द्यांवर लढा देण्यासाठी सज्ज असून कल्याण-डोंबिवलीत पुन्हा भगवा फडकविण्यास कटिबद्ध आहेत. असे मत जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

आर एल न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 5 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे